Home » कोविडची भीती पळवून लावणाऱ्या डॉ.रवी गोडसेंनी 4 हॉलीवुड चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे..
खास तुमच्यासाठी! झाल कि व्हायरल!

कोविडची भीती पळवून लावणाऱ्या डॉ.रवी गोडसेंनी 4 हॉलीवुड चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे..

मागील दोन वर्षांपासून संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक विडियो सोशल मिडियावर व्हायरलं होत होते. अनेक डॉक्टर संपूर्ण जगातील लोकांना सकारात्मक ऊर्जा देत होते. मनात असलेली भीत कमी करत होते. लोकांच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांची योग्य उत्तरे देत होते. यामध्ये अमेरिकेत काम करणारे आणि आपल्या महाराष्ट्राचे पुत्र असलेले रवी गोडसे अगदी त्यांच्या हलक्या-फुलक्या शैलीत सर्वांना रिलॅक्स करत होते.

कोरोना कसा आला, त्यांची लस कशी बनेल यापासून ते अगदी लहानमुलांना लसीकरण करावे का ? या बरोबरच आता भारतात तिसरी लाट येणार नाही हे छाती ठोक सांगणारे रवी गोडसे यांच्याबद्दल सामान्य नागरिकांच्या मनात असंख्य प्रश्न आहेत. रवी गोडसे कोठले आहेत, ते काय काम करतात? यासारख्या अनेक गोष्ट आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

रवी गोडसे यांचा जन्म कोकणातील रत्नागिरी येथे झाला. प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमात पूर्ण करून रवी पुढील शिक्षणासाठी मुंबईत आले. डोंबविलीत ते राहिले. त्या नंतर मुंबईतील प्रसिद्ध अशा केम हॉस्पिटलमध्ये त्यांनी एमबीबीएस आणि एमडी हे शिक्षण पूर्ण केले. तब्बल तीन वर्ष केम हॉस्पिटलमध्ये त्यांनी प्रॅक्टिस केली. त्या नंतर ते अमेरिकेला गेले, तेथे त्यांनी पुन्हा एमडी केले आणि आता ते अमेरिकेत रुग्ण सेवा करत आहेत.

रवी गोडसे म्हणतात कोरोना काळात अनेक अफवा पसरत होत्या, तेव्हा मला वाटलं अरे लोकं काहीही चुकीच पसरवत आहेत, आपण यावर काहीतरी करायला हवे. त्या नंतर मी असाच एक वेगळ्या शैलीतील एक विडियो बनवून फेसबुकवर टाकला. लोकांना तो आवडला. लोकांना हळूहळू माझी प्रेझेंट करण्याची स्टाइल आवडू लागली. मला देखील मग विडियो बनवण्याचं वेड लागलं.

मला आधीपासूनच कोणतीही गोष्ट फनी वेने सांगायची सवय होती.मग मी असेच लोकांच्या मनात असलेले प्रश्न घेऊन विडियो बनवू लागलो. असं गोडसे आवर्जून सांगतात. रवी गोडसे यांनी स्वता चार हॉलीवुड चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले आहे.

गोडसे स्वता कोरोना रुग्णांना ट्रीटमेंट करतात. आता पर्यत त्यांनी 5000 हजार कोविड रुग्णांना ट्रीट केले आहे. भारतातील हजारो लोकांना त्यांनी अमेरिकेतून फोनवर मार्गदर्शन केले आहे. रवी गोडसे लोकांना एक सांगतात मास्क घाला, नियम पाळा. पण रवी म्हणतात मी लोकांना सल्ला देतो पण सर्वजण माझा सल्ला 100 टक्के पाळतात असे नाही.भारतातले 14 टक्के लोक फक्त मास्क घालतात, त्यामुळे मी काहीही सल्ला जरी दिला तरी किती लोक तो सल्ला फॉलो करतील हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे मी काहीही सल्ला देवो लोक त्यांना जे वाटते तेच करतात. असं गोडसे सांगतात.

गोडसे सांगतात की कोणतेही गोष्ट घ्या त्याला फायदे आणि तोटे असतात. तसचं लसिकरणांचा आहे. त्यामुळे लसीकरण सर्वांना करावं. भारत सरकार लसीकरण उत्तम करत आहे , पण ते अधिक जलद गतीने करायला हवे. गोडसे म्हणतात लहान मुलांना लस द्यायची की नाही हे सरकारने न ठरवता त्या मुलांच्या पालकांना ठरवू द्या.त्यांना जर वाटतं असेल की आपल्या मुलांना लस द्यावी तर त्यांना देऊ द्या.