वर्धा देवळी मार्गावरील सेलसुरा येथे रात्री 12.30 त्या सुमारास झालेल्या कारला अपघात सात तरुणांचा जागीच मृत्यु झाला आहे. सावंगी इथल्या वैद्यकीय महाविद्यालयातले हे सर्वजण एमबीबीएसचे शिक्षण घेत होते. मृतांमध्ये तिरोडयाचे आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आविष्कार यांचा समावेश आहे. हे सर्वजण मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
सेलिब्रेशन केल्यानंतर परतत असताना अपघात झाला. दुभाजकला धडकुन झायलो गाडी पुलावर 40 फुट खाली कोसळली. त्यात गाडीतील सर्व गतप्राण झाले. मृत्यु झालेले सर्व तरुण 25 ते 35 वयोगटातील आहेत. अपघात इतका भीषण होता की गाडीचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला.विरुद्ध दिशेन येणाऱ्या ट्रक चालकास याबाबत माहिती मिळाली. त्याने सावंगी पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली.
अपघातांच्या घटनेची माहिती मिळताच वर्ध्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप, सावंगी पोलिस निरीक्षण घटनास्थळी तातडीने दाखल झाले आहेत. पहाटे चार पासून मृत देह बाहेर काढण्याचे काम सुरू होते. अपघात झालेली गाडी बाहेर काढण्यासाठी तर चक्क जेसीबीची मदत घ्यावी लागली. पोलिसांच्या मदतीला तेथील स्थानिकांनी धाव घेतली. उपविभागीय पोलिस अधिकरी पीयूष जगताप यांच्या माहितीनुसार रात्री 12.30 च्या सुमारास सावंगी पोलिसांना अपघाताची माहिती मिळाली.
यानंतर प्रशासकीय अधिकारी व तेथील कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. यावेळी त्यांनी रस्त्यावर कुठेही अपघातग्रस्त वाहन दिसलं. खाली जाऊन पाहणी केली असता सात जणांना मृत्यु झाल्याचं लक्षात आलं. त्यावेळी मृतदेहाची ओळख पटली नव्हती. स्थानिक पाटील व गावातील लोकांच्या मदतीने गाडी दूर केली. आणि मृतदेह वर्धा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले.
प्राथमिक अहवालानुसार चालकाचं नियंत्रण सुटून हा अपघात झाला. असा अपघात झाला असा अंदाज आहे. नीरज चौहान आविष्कार रहांगडाले (एमबीबीएस पहिलं वर्ष) नितेश सिंह( इंटर्न) विवेक नंदन ( एमबीबीएस अंतिम वर्ष) यातील आविष्कार हा तिरोडाचे आमदार विजय रहांगडालेंचा मुलगा होता.