Home » हेल्मेटशिवाय सुसाट कुठेही फिरतो तरी पोलीस दंड नाही लाऊ शकत, पण असं का?
झाल कि व्हायरल!

हेल्मेटशिवाय सुसाट कुठेही फिरतो तरी पोलीस दंड नाही लाऊ शकत, पण असं का?

हेल्मेट न वापरण्याचं पोलिसांकडून प्रमाणपत्र मिळालेला हा झाकीर मेनन (zakir memon) आहे तरी कोण? हेल्मेट न वापरण्यावर कितीही चलान जरी वाढलं तरी त्याला कोनत्याही वाहतूक पोलिसांकडून अडवलं जात नाही. आणि सांगायचं म्हणजे तर तो कुठल्याही मंत्र्याचा किंवा सेलीब्रीटी चा मुलगा नाहीये, तरीही त्याला एवढी सवलत कशी काय? कोणीही व्यक्ती विना हेल्मेट जरी आलं तर त्याला चलान पाठवल्या शिवाय वाहतूक पोलीस राहत नाही. पण हा झाकीर विना हेल्मेट भुर्र निघून जातो. तर थोडसं जाणून घेवूया या झाकीर मेनन बद्दल,

तो गुजरातमधील छोटा उदपूर (udaipur gujarat) येथे राहतो. झाकीर हा वाहतूक नियमांचं काळजीपूर्वक पालन करतो. त्याला एका सिग्नल वर अडवण्यात आलं. त्याच्या कडे सगळी कागदपत्रे होती, परंतु त्याच्याकडे हेल्मेट नव्हते, तर पोलिसांनी त्याला विचारलं तू हेल्मेट का वापरत नाही. तर त्याच उत्तर ऐकून तुम्हीही दंग व्हाल, झाकीर म्हणाला कि साहेब मला हेल्मेट वापरायच आहे परंतु माझ्या डोक्याचं माप एवढ आहे कि त्याचं हेल्मेट कुठेही मिळत नाही, मी शहरात प्रत्येक ठिकाणी शोधलं परंतु माझ्या मापाचं हेल्मेट कुठेही मला मिळालं नाही.

वाहतूक पोलिसांनी त्याला वेगवेगळे हेल्मेट आणून लावून बघितले पण कोणतही हेल्मेट त्याला येईना, त्यांनी त्याची अडचण लक्षात घेतली आणि त्याला जाऊ दिले. आणि त्याला कोणत्याही वाहतूक पोलिसांनी भविष्यात अडवू नये म्हणून प्रमाणपत्र देण्यात आलं.