अमिताभ बच्चन यांचा ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ हा चित्रपट तुम्ही बघितलाय का? इंग्रजांची राजवट असतांनाचा सगळा काळ त्या चित्रपटात दाखवलाय. ज्यात अमिताभ बच्चन आणि आमीर खान इंग्रजांना लुटतात आणि लुटीचे पैसे हे गरिबांना वाटतात. पण आता देश स्वतंत्र झालाय. तरीही, देशातले काही ठग्स हे कमी झाले नाहीयेत. फरक इतकाच, तेंव्हाचे ठग्स इंग्रजांना लुटायचे आणि आताचे ठग्स हे आपल्याला लुटताय. आता एका अफलातून ठगाच नाव आहे सुकेश चंद्रशेखर. या पठ्ठ्याने बॉलीवूड ची हि पुरती झोप उडवलीये, कारण त्याने केलेल्या करणाम्यांमध्ये एक-दोन नाही तर पंधरा अभिनेत्रींचा समावेश आहे. त्यातल्या काहींना तर ईडीने चौकशीसाठी बोलवलंय. काय कहाणी आहे आताच्या ठग्स ऑफ हिंदुस्तान ची पाहूयात.
कधी सरकारी अधिकारी म्हणून तर कधी थेट सन टीवी चा मालक, कधी सर्वात मोठा फॅन, तर कधी चित्रपट निर्माता, कधी बालाजी, तर कधी रात्नावाला, कधी जय ललीतांचा नातेवाईक, तर कधी कुमार स्वामींचा मित्र. अशा अनेक रुपात पाहायला मिळणारी हि कहाणी आहे ठग्स ऑफ हिंदुस्तान सुकेश चंद्रशेखर ची. सध्या हा ठग दिल्लीच्या तिहार जेल मध्ये आहे. पण तिथूनही त्याने आपला खेळ सुरूच ठेवलाय, त्याने दिलेले महागडे गिफ्ट्स आणि त्याच्या आजूबाजूला सतत असलेल्या नट्यांमुळे तो कायम चर्चेत राहिला. त्याने दिलेल्या सगळ्या गिफ्ट्समुळे सगळ्या नट्यांचा चांगलाच बाजार उठ्वालय. त्यात सर्वात पाहिलं नाव आहे जॅकलिन फर्नांडिस. जॅकलिन आणि त्याची कहाणी २०२० साली सुरु झाली. त्यांची ओळख कशी झाली हि देखील एक रंजक कहाणी आहे.
२०२० मध्ये सुकेशनं माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. २०२१ मध्ये त्यानं माझ्याशी संपर्क केला. सुकेशनं मला शेखर रत्नावाला अशी त्याची ओळख सांगितली. मी सन टीवी चा मालक आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललितांचा नातेवाईक आहे, त्यामुळे आपण दक्षिणेत काही चित्रपट आणि सन टीवी चे प्रोजेक्ट एकत्र करू असंही सांगितलं. असं जॅकलिन चं म्हणन आहे.
दोघांची मैत्री इतकी घट्ट झाली कि त्यानं जॅकलिन ला कोट्यावधींची गिफ्ट्स द्यायला सुरुवात केली. आता कोणकोणते गिफ्ट्स त्याने दिले त्याची यादी तर अफाट आहे. एस्पुएला नावाचा घोड्यापासून तर गुच्ची ब्रांडची हँडबॅग, दागिने, महागडे कपडे. फक्त जॅकलिनच नाही तर तिच्या आईवडीलांना महागडी कार, जॅकलिन च्या भावाला ऑस्ट्रेलियात ५० हजार अमेरिकन डॉलर, जॅकलिन च्या बहिणील बीएमडब्ल्यू कार. हे सगळे गिफ्ट घेताना खुद्द जॅकलिनलाही कळाल नसेल, ह्या सगळ्यांचा हिशेब तिला ईडी च्या कार्यालयात द्यावा लागेल. आता ईडीने तिची चौकशी केलीये आणि देशभरातील बातम्यांमध्ये जॅकलिन फेमस झाली.
राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणामध्ये अडकल्यानंतर सुकेशने शिल्पाला संपर्क केला होता, शिल्पा शेट्टी ही सुकेशची मैत्रीण आहे. राज कुंद्रांच्या अटकेनंतर दोघांमध्ये जामिनासंदर्भात चर्चाही झाली. यावर शिल्पा शेट्टीकडून कोणताही खुलासा आलेला नाहीये. पण सुकेशच्या मायाजालात अडकलेली जॅकलिन ही काही एकटी नाहीये, तर नोराचीही सध्या ED चौकशी सुरु आहे. आरोप पत्रातल्या आरोपा नुसार सुकेश चन्द्रशेखर ने नोरा फतेहीला एक बीएमडब्ल्यू कार आणि एक आय फोन गिफ्ट केला, ज्याची किंमत 1 कोटींच्या घरात होती, सुकेश जेलमध्ये असतांना सुद्धा त्याच जॅकलिनशी बोलण होत होतं, जामिनावर जेंव्हा तो जेल च्या बाहेर आला तेंव्हा सुकेशने दिल्लीहून चेन्नई ला जाण्यासाठी एक चार्टर फ्लाईट बुक केलं, त्यानंतर जॅकलिन आणि सुकेश चंद्रशेखर हे दोन दिवस एका हॉटेल मध्ये वास्तव्याला होते. केवळ हवाई प्रवासावर सुकेश चंद्रशेखर ने तब्बल ८ कोटी रुपये खर्च केलेत. त्याचबरोबर श्रद्धाकपूरचही नाव सुकेश च्या चौकशीत पुढे आलंय. सुशांत सिंघ राजपूत आत्महत्या प्रकरणात एनसीबीने आमली पदार्थांच्या चौकशसाठी श्रद्धा कपूरला बोलवल होतं. त्याच प्रकरणातून श्राद्धाला बाहेर पडण्यासाठी मदत केली होती. असा दावा सुकेश चंद्रशेखरने केलाय.