Home » “माफी मांगो राज ठाकरे, अगर अयोध्या आना है” राज यांच्या युपी दौऱ्याअगोदरच गाणं तुफान व्हायरल
झाल कि व्हायरल!

“माफी मांगो राज ठाकरे, अगर अयोध्या आना है” राज यांच्या युपी दौऱ्याअगोदरच गाणं तुफान व्हायरल

राज ठाकरे नेहमी चर्चेत असणारे व्यक्तिमहत्व आहे. येणारा प्रत्येक दिवस राज यांची लोकप्रियता अधिकच वाढवत आहे. आधी मशिदीवरील भोंगे आणि आता राज यांचा अयोध्या दौरा. भाजपाच्या नेत्यांनी राज यांना इशारा दिला आहे, की अयोध्येत जर पाऊल ठेवायचे असेल तर तुम्हाला आधी उत्तर प्रदेशच्या नागरिकांची माफी मागावी लागेल, त्या नंतरच तुम्ही पाऊल ठेवू शकता.

राज यांची 2005 ते 2012 दरम्यान यूपी आणि बिहारी कामगारांवर जोरदार टीका केली होती. त्यांचा राग अजून देखील यूपीच्या नागरिकांच्या डोक्यात आहे. यूपीतून आता राज यांनी माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. भोजपुरी गाण्यातून कवि योगेश दास शास्त्री यांनी राज यांना ईशारा दिला आहे.

महेश निरमोही आणि बब्बन विष्णु यांनी देखील हे गाणं गायलं आहे. या गाण्यात असे म्हटले आहे की राम जन्म भूमी असलेल्या युपीचा राज तुम्ही अपमान केला आहे.

“कदम नही रखने देगे ए नेताजीने ठाणा है, माफी मागो राज ठाकरे अगर अयोध्या आणा है, श्रीराम के वंशज है हम, श्रीराम का भी यह अपमान है, माफी मांगो राज ठाकरे यूपी मै यह येलान हुवा, पाच जून को चलो अयोध्या अपना फर्ज निभाना है, माफी मागो राज ठाकरे अगर अयोध्या आना है”. अशा आशयाच्या भोजपुरी गाण्यातून राज यांना ब्रजभूषण सिंह यांनी इशारा दिला आहे. हे गाणे सध्या प्रचंड व्हायरलं होत आहे.

आता राज खरंच माफी मागणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. युपीसह संपूर्ण देशांत हे गाणं व्हायरलं होत आहे. राज यांना हटके अंदाजात या गाण्यातून इशारा दिला आहे.