Home » सांगलीच्या रँचोची ‘जुगाडू जिप्सी’ देशात फेमस, आनंद महिंद्रांनी दिली नव्या बोलेरोची ऑफर
झाल कि व्हायरल!

सांगलीच्या रँचोची ‘जुगाडू जिप्सी’ देशात फेमस, आनंद महिंद्रांनी दिली नव्या बोलेरोची ऑफर

फोर व्हीलर गाडी म्हटलं कि आपल्याला एक पद्धतशीर व्यवस्था असलेली आरमदाई गाडी आठवते. जिच्यात फक्त बसायचं म्हटल्यावर चावी फिरवून गाडीला स्टार्टर दिला, कि येणारा आवाज आणि AC सुरु केल्यावर बोचणारी थंडीसुद्धा एकदम दिल खुश करून टाकते. पण सध्या सोशल मिडीयावर एक अशी फोर व्हीलर ट्रेंडमध्ये आहे, जी किक मारल्यावर स्टार्ट होते. पाहायला गेलं तर ना दारं आहेत ना खिडक्या. पण तीचं कौतुक थेट महिंद्रा ग्रुप चे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी केलंय. सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुक्यात देवराष्ट्रे नावाचं गाव आहे.

तिथल्या दत्तात्रय लोहार यांनी टाकाऊ पासून टिकाऊ कन्सेप्ट वापरून हि भन्नाट जिप्सी तयार केलीये. आनंद महिंद्रा यांनी या अफलातून गाडीच नुसतं कौतुकाच केलं नाही, तर त्या मिनी जिप्सी च्या बदल्यात लोहार यांना चक्क नवी कोरी बोलेरो देण्याचीही घोषणा केली आहे. लोहार यांनी बनवलेली मिनी जिप्सी, त्यावर आनंद महिंद्रा यांनी काय प्रतिक्रिया दिली, या बद्दल जाणून घेवूयात.  

दत्तात्रय लोहार यांनी बनवलेली हि मिनी जिप्सी नेमकी आहे कशी? फेब्रीकेशनचं काम करणारे दत्तात्रय लोहार हे एका हाताने अपंग आहेत. त्यांच शिक्षणही फारसं झालेलं नाही. पण बुद्धी किती तल्लक आहे हे त्यांनी बनवलेल्या जिप्सी वरून लक्षात येतं. हि एक चार चाकी गाडी आहे. पण तिला पुढची चाकं आहेत रिक्षाची, आणि मागची दोन चाकं आहेत स्कूटीची. तर बॉडी बनवण्यात आलीय टू व्हीलर चे पार्ट आणि भांगारातल्या वस्तू वापरून. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल कि, असली हायब्रीड गाडी कसली डूगु डूगु चालत असेल. पण थांबा, असं अजिबात नाहीये. गाडी भलेही किक मारून स्टार्ट होत असेल, पण चार पाच जण यातून निवांत प्रवास करू शकतात.

आपल्या भारतीय लोकांसमोर फरारी ठेवा किंवा लम्बोर्गिनी एक प्रश्न फीक्स विचारला जातो, तो म्हणजे मायलेज किती देते. आता लोहार यांनी बनवलेली मिनी जिप्सी हायब्रीड असली तरी तिच्या मायलेज बाबत लोकांना प्रश्न पडतोच. हि मिनी जिप्सी मायलेज देते एक लिटर पेट्रोल मध्ये चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर. म्हणजे मायलेजच्या बाबतीतही तिला तोड नाहीये. या गाडीचा स्पीड सुद्धा तासाला चाळीस किलोमीटर आहे. आपल्या सोयीचा आणखीन एक प्रश्न पडतो कि गाडी कितीत पडलीये. तर दत्तात्रय लोहार यांना हि गाडी बनवन्यासाठी खर्च आलाय तो ५० ते ६० हजार रुपये. त्यांच्या पत्नीनंही हि गाडी बनवण्यात त्यांची मदत केलीय.

आता बघूया आनंद महिंद्रा या मिनी जिप्सी बद्दल नेमकं काय म्हणालेत. तर, महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट वरून या मिनी जिप्सी चा व्हिडीओ शेअर केला आहे. ते म्हणतात खरं तर हि जिप्सी कोणत्याही नियमांची पूर्तता करत नाही. पण, आपल्या लोकांच्या कमी साहित्यातून जास्त गोष्ठी निर्माण करण्याच्या क्षमतेच आणि कल्पकतेच कौतुक करणं मी सोडणार नाही. आणि वेगा बद्दलचं वेड आणि सगळ्यांच्या पसंतीच जिप्सीचं फ्रंट ग्रील याबद्दल तर बोलायलाच नको. नियमांचं उल्लंघन करत असल्याने स्थानिक प्रशासन आज न उद्या या गाडीवर बंदी घालणार हे नाक्कीये. पण या मिनी जिप्सी च्या बदल्यात मी त्यांना नवी कोरी बोलेरो द्यायला तयार आहे. त्यांच हे मिनी जिप्सीचं क्रिएशन आम्हाला प्रेरणा देण्यासाठी महिंद्रा रिसर्च सेंटरमध्ये डिस्प्ले केलं जाऊ शकतं. कारण रिसोर्सफुलनेस म्हणजे कमी रिसोर्समधून जास्तीत जास्त गोष्टींची निर्मिती करणे. असं हि ते ट्वीट द्वारे म्हाणाले आहेत.

या ट्वीट नंतर आनंद महेंद्रा यांच्या नेतृत्वाच आणि दत्तात्रय लोहार यांच्या भन्नाट आयडीया चं भरपूर कौतुक होत आहे. माध्यमांनी या गोष्टीची दाखल घेत यावर भरभरून कौतुक केलंय. काही लोकांना मात्र प्रश्न पडलेत ते असे, कि बोलेरो ला पेट्रोल आणि मेंटेनन्स साठी येणारा खर्च लोहार यांच्या बजेट मध्ये बसणार का? हो आता हा प्रश्न थोडासा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी आहे. पण तरीही, त्यांना नवी गाडी देऊन महिंद्रा त्यांची क्रिएटिवव्हिटी मारत आहेत का? एवढंच नाही तर लोहार यांनी ती गाडी वापरावी कि भाड्यानी द्यावी इथपर्यंत चर्चा पोहोचल्या आहेत.

आता गाडीच काय करायचं ते लोहार आणि महिंद्रा मिळून ठरवतीलंच. पण हा एक गोष्ठ मात्र नाक्कीये कि तुमच्याकडे क्वालिटी आयडिया असेल तर तुमचं नाण खणखणीत वाजतंच. लंडन ला गेलेली बाळू लोखंडेंची खुर्ची झाली आणि आता भंगारातून बनवलेली मिनी जिप्सी. सांगली करांचा नादच नाही. तुमच्या आजूबाजूलाही अशा क्वालिटी आयडीया वापरून भारी गोष्ठी बनवणारे कार्यकर्ते असतील, तर त्यांना आमच्यापर्यंत पोचवा.