Home » ओळखलं का? समीर दाऊद वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा फोटो व्हायरल !
झाल कि व्हायरल!

ओळखलं का? समीर दाऊद वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा फोटो व्हायरल !

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) सध्या माध्यमांमध्ये खूप चर्चेत आहेत. त्यांचं अभिनेत्री क्रांती रेडकर हिच्याशी झालेल्या लाग्नागोदर एक कथित लग्न झाल्याचा फोटो सोशल मिडिया वर जोरदार व्हायरल झालाय. या फोटोतून दावा केला गेलाय कि समीर वानखेडे यांचा डॉ शबाना कुरेशी (Shabana Qureshi) हिच्याशी आधी विवाह झालाय. आणि हाच त्या पहिल्या लग्नातील फोटो आहे. हा फोटो अधिकृत नाहीये किंवा कुठलीही खात्री झालेली नाही.

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांनी वानखेडेचा हा फोटो ट्विट केला आणि आणि सर्वत्र एकाच खळबळ उडालीये. “पैचान कौन?” असं लिहित मलिकांनी वानखेडेंच्या कथित लग्नाचा फोटो प्रदर्शित केलाय.

त्या ट्विट नंतर “Sameer Dawood Wankhede का यहां से शुरू हुआ फर्जीवाड़ा” मलिकांनी काही खळबळजनक कागदपत्रे देखील शेयर केलेत. एका महापालिकेचा तो कागद आहे यापलीकडे त्यात काही लक्षात जरी येत नसेल, तरीही मलिकांनी शेयर करतांना त्यावर समीर दाउद वानखेडे याचा फार्जीवाडा इथून सुरु झाला अस म्हटल.

समीर वानखेडे काय म्हणाले?

माझ्याबद्दलचे कागदपत्रे खोटे आहेत. संबंधित प्रकरणाला आपण चालेंज करू. माझ्या मूळ गावी जाऊन पाहू शकता. माझा जन्मदाखला सोशल मिडीया वर खोटारड्या पद्धतीने पसरविला जात आहे. याबाबत लवकरच जाहीर खुलासा करणार आहे.

समीर वानखेडे हे सध्या अभिनेत्री क्रांत्री रेडकर ह्यांचे पती

समीर वानखेडे हे मनोरंजन विश्वातील अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) ह्यांचे पती आहेत. त्याचं २०१७ साली लग्न झाल्याची माहिती आहे. दोघांना जुळी मुले देखील आहेत. क्रांती रेडकर ह्यांनी अनेक मराठी चित्रपटात देखील काम केलेलं आहे.