आयकर विभागाने काल एका व्यापाऱ्याच्या घरावर छापा टाकला. उत्तर प्रदेशमधील आता हा फक्त एक छापा नव्हताच मुळात. सुरुवातीला, आयकर खात्याने कनौजमधील एका घरावर हा छापा मारला होता. ज्या व्यापाऱ्याच्या घरी छापा टाकला गेला तिथे पैश्याचं मोठ घबाड सापडलं जे मोजायला मशीन कमी पडल्याच, पण न्यायला चक्क मोठा टेम्पो मागवण्यात आला.
अत्तराचा व्यापारी पियुष जैन (piyush jain income tax raid) नामक व्यापाऱ्याच्या घरावर हि छापेमारी झाली. आत्तापर्यंत तब्बल 177 करोड रुपये त्याच्याकडे मिळाल्याची माहिती मिळतेय. त्या घरात नोटांनी भरलेल्या आलमारी आणि तळघरात भरपूर प्रमाणात रक्कम मिळाल्याची आयकर विभागाची माहिती आहे.
आपण विचारही करू शकणार नाही या व्यापार्याकडे इतका पैसा आला कसा? भारताच्या एका व्यक्तीची कमाई २०२० मध्ये 1900 डॉलर पेक्षा अधिक असली तरीही 2000 डॉलर पेक्षा कमीच आहे. त्यात ह्या महाशायाकडे इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम आयकर विभागाच्या छाप्यात मिळाल्याने देशभर खळबळ निर्माण झाली.
अस म्हटलं जातंय कि हि छापेमारी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या अनुषंगाने झालीये. कारण पियुष जैन हा अखिलेश यादव यांचा खास जवळचा माणूस असल्याच समजतंय. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत, जैन याच्या मुंबई, कनौज, गुजरात आणि कानपूर अश्या अनेक ठिकाणांवर छापेमारी झाली. आयकर विभागाच्या पूर्ण टीम कडून त्याची कंपनी, कार्यालय, पेट्रोल पंप या ठिकाणावर छापेमारीत हि रक्कम मिळाल्याच समजतय.
पियुष जैन हा मुळचा कनौज चा राहणारा आहे. तो भारतातील सर्वात मोठ्या अत्तर व्यापाऱ्यांतील एक आहे. भारताबाहेरही त्याच्या कंपनीच अत्तर एक्स्पोर्ट होत. कानपूर आणि मुंबई या शहरांमध्ये त्याच्या परिवारातील लोकं राहायला असतात. त्यानुसार, पियुष जैन हा 40 कंपन्यांचा मालक आहे, ज्यामध्ये २ मिडल इस्ट मध्ये स्थित आहेत. जैन याच्या मुंबई शोरूममधील अत्तर देशभर तसच विदेशातही विकल जातं.