पंतप्रधान नरेंद्र मोदी मागील दोन दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशातील वाराणसी येते होते, मोदीसाठी हा दौरा अतिशय महत्त्वपूर्ण होता, कारण मोदीनी वाराणसी शहराचा कायापालट केला. तसेच प्रसिद्ध अशा काशी विश्वनाथ कॉरीडॉर या महत्वपूर्ण प्रोजेक्टची पायाभरणी देखील केली.
एरव्ही देखील अनेक मंत्री त्यांच्या प्रोजेक्टचे लोकार्पण करतात. पण मोदीनी मात्र हा सोहळा एक इवेंट केला. मोदींच्या या इवेंटची जगभरात चर्चा झाली. इवेंट पेक्षा मोदीचा आणखी एक फोटो तूफान व्हायरलं झाला, तो फोटो म्हणजे मोदीनी काशी विश्वनाथ मंदिराचे जे काम करणार आहेत, अशा मंजुरासोबत त्यांनी भोजन केले. एक पंतप्रधान जेव्हा मंजुरानसोबत जेवतात, तेव्हा चर्चा तर होणाराच ना? अगदी त्या प्रमाणे मोदी यांच्या त्या फोटोची प्रचंड चर्चा झाली.
मोदीना सामान्य नागरिकांबद्दल किती कळवळा आहे, मोदी किती डाऊन टू अर्थ आहेत, अशा अनेक चर्चा झाल्या. मोदीचा हा साधेपणाअनेकांना भावला काहीनी मात्र यावर जोरदार ठिका केली. काहीच्या मते मोदीनी फक्त प्रसिद्धीसाठी ते जेवण केले. असे म्हटले आहे.
आगामी काळात उत्तर प्रदेशच्या निवडणुका आहेत, त्यांचा विचार करून मोदी यांनी हा लोकार्पण सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यासाठी सरकारी तिजोरीतुन मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला गेला. हा एक हायटेक सोहळा होता. या सोहळ्या नंतर मोदी यांच्यावर अनेक कारणांनी टीका झाली.
मोदीनी गंगा नदीत डुबकी लावली, मोदीनी किती कपडे बदलले, मोदी भाषण करण्यासाठी जी स्क्रीन म्हणजे जे मशीन वापरतात या सारखे अनेक मुद्दे जोरदार चर्चिले गेले. यामध्ये सर्वाधिक जो फोटो आणि जो मुद्दा गाजला तो म्हणजे मोदीनी मंजुरांसोबत पंक्तीत बसून केलेले जेवण. या फोटोवरून मोदी यांच्या मोठी टीका झाली. मोदी हे सर्व प्रसिद्धसाठी करतात, मंजुराबद्दल त्यांना खरंच इतका कळवळा आहे का? असे सवाल विचारले गेले. मोदीच्या फोटो सोबत आणखी एक फोटो सध्या ट्रेडिंग आहे तो फोटो म्हणजे राजीव गांधी यांचा.
राजीव देखील एक लोकप्रिय पंतप्रधान होते. त्यांचा साधेपणा अनेकांना भावायचा. राजीव देखील मोदी यांच्या प्रमाणे सामान्य नागरिकांसोबत जेवत आहेत. हा फोटो व्हायरलं होत आहे कारण अनेकांचे म्हणणे आहे, मोदी हे पहिले पंतप्रधान नाहीत, जे असे पंक्तीत बसून जेवत आहेत. मोदी यांची जास्त चर्चा झाली कारण मोदी प्रसिद्धीवर जास्त लक्ष देतात.
मोदी यांच्या काळात सोशल मीडिया अधिक आहे पण राजीव यांच्या काळात मात्र इतका सक्रिय सोशल मीडिया नव्हता, त्यामुळे राजीव यांचा हा इवेंट जास्त प्रसिद्ध झाला नाही. राहुल गांधी देखील अनेकदा सामान्य नागरिकांमध्ये जाऊन जेवतात. मोदी हे कोणतेही काम असो त्यांच्या हटके स्टाइलने करतात. त्यामुळे ते संपूर्ण जगात नेहमी चर्चेत असतात.
तसे पाहता हा फक्त लोकार्पण सोहळा होता पण मोदीनी मात्र या सोहळ्याला एकदम हाय प्रोफाइल बनविले. मोदीच्या नेहमीच काहीतरी वेगळं करतात आणि संपूर्ण जगाचा मीडिया त्यांच्याकडे वळतो. पण मोदीचे जितके कौतुक होते तितकीच किंवा त्याहून अधिक त्यांच्यावर ठिका होते.
सध्या भारतात मोदी भक्त आणि मोदी विरोधी असे दोन वर्ग तयार झाले आहेत. मोदी फक्त आहेत ते मोदीच्या प्रत्येक कृतीचे कौतुक करतात तर मोदी विरोधी लोक मात्र एकच सवाल उपस्थित करतात. राजीव यांच्या काळात सोशल मीडिया इतका सक्रिय नव्हता.