Dharmaveer Trailer Launch: शिवसेनेला ठाण्यात बळकटी देणाऱ्या आणि कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या आनंद दिघे (Dharmveer Anand Dighe) यांचा जीवनप्रवास एका चित्रपटातून प्रदर्शित होणार आहे. ‘धर्मवीर: मुक्कम पोस्ट ठाणे’ असं चित्रपटच नाव असून, प्रवीण तरडे यांनी लिहिलेली हि कथा असणार आहे.
एक सामान्य व्यक्ती, शिवसेनेचे कार्यकर्ते आणि थेट ठाण्यातील शेवसेना प्रमुख होऊन घेलेल्या या नेत्याचा प्रवास नक्की कसा होता हे लोकांना पाहता येईल असं म्हटलं जात आहे. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. या कार्यक्रमाला अनेक दिग्गज नेते आणि कलाकारांनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली.
‘धर्मवीर: मुक्कम पोस्ट ठाणे’ (Dharmveer Mukkam Post Thane) या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच समारोहाला स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत, मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे अश्या अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावलेली होती. दरम्यान सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan), रितेश देशमुख आणि इतरही दिग्गज सिनेकलावंत उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान सलमान खानची एक कृती अख्ख्या महाराष्ट्राला भावून गेलीये आणि तोच आता चर्चेचा विषय ठरला आहे.
मंचावर येताच सलमानने सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमेला वंदन केलं. मंचावर वंदन करण्यासाठी पुढे येताच, सलमानने पायातील बूट काढू लागला. हे पाहून शेजारी असलेल्या एकनाथ शिंदेंनी बूट काढण्यास थांबवू लागले.
सलमानने समोर असलेल्या रितेश देशमुखच्या कानात काहीतरी सांगितले आणि तेव्हढ्यात रितेश प्रतिमेला वंदन करण्यास पुढे सरकला. तेव्हा न राहवून मागे उभा असलेल्या सलमानने आपल्या पायातील बूट काढले आणि प्रतिमेला वंदन केलं.
सलमान खान याने केलेल्या या कृतीची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. त्याच्या कृतीचा व्हिडिओ आता सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. सलमानने मंचावर केलेल्या या कृतीने सगळ्यांची मन जिंकलेली आहेत.