Home » ‘खाकीतील सौंदर्यवती’ अडकली लग्नाच्या बेडीत! वाचा पल्लवी जाधव नेमक्या कोण आहेत?
झाल कि व्हायरल!

‘खाकीतील सौंदर्यवती’ अडकली लग्नाच्या बेडीत! वाचा पल्लवी जाधव नेमक्या कोण आहेत?

पोलिस म्हटलं खाकी वर्दी आणि रफ आणि टफ व्यक्तीमहत्व समोर उभं राहतं. पण पीएसआय पल्लवी जाधव (PSI Pallavi Jadhav) या गोष्टीला मात्र अपवाद ठरल्या आहेत. पल्लवी यांनी अनेक सौदर्यवती स्पर्धा जिंकल्या आहेत. पल्लवी जाधव या एक जबरदस्त अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. वर्दी हे त्याचं पहिलं प्रेम आहे तर मॉडेलिंग त्यांचा छंद आहे.

अतिशय कष्ट आणि मेहनत करून त्या पोलिस अधिकारी बनल्या आहेत. कमवा आणि शिका योजनेतून काम करत त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्या सोशल मिडियावर प्रचंड अकटीव्ह असतात. त्यांचे अनेक फोटो आणि रील्स शेअर करत असतात. औरंगाबाद (Aurangabad) येथील कन्नड तालुक्यातील रेल या छोट्या गावात एका सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. पल्लवी सध्या जालना (Jalna)येथील दामिनी पोलिस दलाचे काम पाहतात.

त्या अनेक मुलीना आणि महिलांना प्रोत्साहीत करत असतात. जयपूर येथे 2020 मध्ये ग्लॅमॉन मिस इंडिया (Glamon Miss India 2020) ही स्पर्धा झाली होती त्यामध्ये त्या रनर अप ठरल्या होत्या, त्या नंतर त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या.

पल्लवी यांनी नुकताच लग्नाचा फोटो शेअर करत त्यांचा आनंद चाहत्यांशी वाटला आहे. पल्लवी यांनी कुलदीप यांच्याशी लग्न गाठ बांधली आहे. पल्लवी लवकरच हैद्राबाद कस्टडी चित्रपटात झळकणार आहेत. पोलिस दलातील लोक देखील त्यांचे छंद जोपासू शकतात हे मला दाखवून द्यायचे आहे.

पल्लवी म्हणतात मी वर्दीत असते तेव्हा मी एक प्रामाणिक आणि कडक पोलिस अधिकारी असते तर मंचावर मी एक नाजुक सौन्दर्यवती असते. पल्लवी यांना महाराष्ट्रातील एक सुंदर आणि हुशार पोलिस अधिकारी म्हणून ओळखले जाते. पल्लवी अनेक मुलीसाठी आदर्श आहेत, त्या दाखवून देतात की तुमच्याकडे जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर तुम्ही तुमचे कोणतेही स्वप्न पूर्ण करू शकता. पल्लवी यांनी अनेक मुलीना न्याय देखील मिळवून दिला आहे.