Home » अवघ्या 13 वर्षांच्या मुलाने उभारला स्वतःचा व्यवसाय, उलाढाल आहे 100 कोटी
खास तुमच्यासाठी! झाल कि व्हायरल!

अवघ्या 13 वर्षांच्या मुलाने उभारला स्वतःचा व्यवसाय, उलाढाल आहे 100 कोटी

छोटा बच्चा समज के हमको ना समझाना रे, या ओळी मुंबईतील 13 वर्षीय टिळक (tilak mehta) मेहतासाठी समर्पक आहेत. कारण टिळकच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आली आणि ती त्याने त्यांच्या वडिलांना सांगितली, त्यांच्या वडिलांनी टिळकला हलक्यात घेतले नाही, त्यांनी त्यांच्या आयडियाचा विचार केला आणि आज त्यांचा स्वताचा व्यवसाय 100 कोटीचा आहे. टिळकची नेमकी काय आयडिया होती हे जाणून घेऊया. त्यांचा व्यवसाय काय आहे, हे पाहूया.

टिळक मुंबईत राहतो,मुंबईतील जीवन अतिशय धावपळीचे आहे. एक जागेवरून दुसरीकडे जाणे अतिशय जिकरीचे आहे. टिळक एकदा असाच त्यांच्या मामाच्या घरी राहण्यासाठी गेला होता, त्यांचे मामा देखील मुंबईतच राहत होते. तो दुसऱ्या दिवशी घरी परतला पण त्यांच्या लक्षात आले त्यांची काही पुस्तके मामांच्या घरी विसरली आहेत, दुसऱ्या दिवशी त्यांचा पेपर होता आणि त्याला ती पुस्तके गरजेची होती. वडिलांना सांगावं तर ते ऑफिसमधून थकून भागून येतात आणि त्यांना पुन्हा इतक्या दूर घेऊन जाणे शक्य नव्हते. त्यांच्या वडिलांनी अशी कुरियर कंपनी शोधली जी 24 तासात त्याला पुस्तके आणून देईल पण अशी एकही कंपनी त्याला सापडली नाही.

या प्रसंगावरून टिळकच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आली. शहरातल्या शहरात 24 तासाच्या आत जलद कुरियर कंपनी आपण जर स्थापन केली तर, त्यांनी त्यांची ही आयडिया त्यांच्या वडिलांना सांगितली, त्यांना देखील आयडिया फार आवडली, त्यांनी यावर अभ्यास केला आणि टिळक व त्यांच्या वडिलांनी पेपर्स आणि पार्सलस नावाची कंपनी सुरू केली.

आज एका वर्षात टिळकची कंपनी मुंबईतील 24 तासात स्वस्तात कुरियर देणारी नंबर एक कंपनी बनली आहे (paper and parcel company). टिळकला नुकताच इंडिया मेरिटाइम पुरस्कार मिळाला आहे. कुरियर पोहच करण्यासाठी टिळकने मुंबईच्या डब्बेवाल्यांची (Mumbai Dabbawala) देखील मदत घेतली आहे. ते देखील आता टिळकच्या कंपनीसाठी ते देखील काम करतात, यातून त्यांना देखील चांगलं उत्पन्न मिळत आहे.

टिळक म्हणतो डब्बेवाले मला चांगलेच माहीत आहेत, ते अगदी वेळेवर जेवण शहराच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहच करतात. ज्यासाठी त्यांचे मोठे नेटवर्क देखील आहे. डब्बेवाले आता टिळकच्या कंपनीचे ब्रँडिग आणि डिलिव्हरी देखील करतात, डब्बेवाले यांना या निमित्ताने उत्पन्नाचा एक वेगळा सोर्स मिळाला आहे.

डब्बेवाले त्यांच्या मोकळ्या वेळेत हे काम करत आहेत. टिळकचे वडील विशाल मेहता म्हणतात तुमच्या मुलांच्या डोक्यात ज्या कल्पना येतात त्यांना दाबून टाकू नका. त्यांना प्रोत्साहन द्या, तुमचा मुलगा दरवेळेस पहिला यावा ही अपेक्षा देखील ठेवू नका. त्यांच्या कल्पना शक्तीला वाव द्या. मग पहा किती भन्नाट आयडिया समोर येतात.