Home » नाशिकचे सचिन अहिरे रातोरात सोशल मिडीया स्टार कसकाय झाले?
खास तुमच्यासाठी! झाल कि व्हायरल!

नाशिकचे सचिन अहिरे रातोरात सोशल मिडीया स्टार कसकाय झाले?

सोशल मिडियावर कधी काय होईल आणि कोण कसा फेमस होईल हे सांगता येत नाही. सोशल मिडीयावर एखादा व्यक्ती कधी चमकू शकतो हे कोणी सांगू शकत नाही, आता हेच पहा नाशिकचे सचिन अहिरे (Sachin Ahire) सोशल मिडियावर सध्या स्टार झाले आहेत. कोणी त्यांना पाठिंबा देत आहे, तर कोणी त्यांच्यावर विनोद करीत आहे, कोणी मीम्स बनवत आहे, पण कोण आहेत हे सचिन अहिरे जे व्हायरलं झाले आहेत. तर आज आपण सचिन अहिरे यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.

सचिन अहिरे, नाशिकमधील (Nashik) एक सर्वसामान्य नागरिक आहेत. ते पेशाने इंग्लिश विषयांचे शिक्षक आहेत. पण सचिन अहिरे यांना सामाजिक कार्याची जबरदस्त आवड आहे. ते एक जागरूक नागरिक आहेत. जर कोठे खूप कचरा पडला असेल तर सचिन तेथे जाऊन तो कचरा जमा करतील, साफ-सफाई करतील. कोठे रस्त्याला जर खड्डे असतील तर ते खड्डे ते बुजवतात. नेते मंडळी जेव्हा एखादा इवेंट किंवा कार्यक्रम करतात तेव्हा त्यांचे कार्यकर्ते त्यांचे फोटो टाकतात, पोस्ट करतात पेपरमध्ये बातम्या येतात पण अहिरे सर मात्र स्वताच स्वताचे फोटो सोशल माध्यमांवर टाकतात, फेसबुक लाईव्ह करतात. स्वताच स्वता केलेले काम दाखवतात.

सुरवातीला अहिरे सरांच्या कामाची दखल कोणी घेतली नाही, पण आता अवघ्या काही महिन्यांवर नाशिक महापालिकेच्या निवडणुका (Nashik Mahanagar Palika Election) तोंडावर आल्या आहेत. आणि आता अहिरे सरांच्या नावाची चर्चा जोरदार सुरू झाली आहे. सोशल मिडियावर सुरवातीला अहिरे सरांवर अनेक विनोद आले, मीम्स आले पण आता मात्र अहिरे सरांना लोक सिरियसली घेऊ लागले आहेत.

विरोधकांना एकच भीती अहिरे सरांना लीड किती

अहिरे सर मागे झालेल्या नाशिक महापालिकेच्या निवडणुकीला देखील उभे राहिले होते पण ते विजयी झाले नाहीत. पण अहिरे सरांना तेव्हा देखील चांगली मते मिळाली होती. अहिरे सर उच्चशिक्षित आहेत, जनतेच्या समस्यांची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे या निवडणुकीत सचिन अहिरे सर निवडणून येणार असल्याची जोरदार चर्चा फक्त नाशिकात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात रंगली आहे.

अहिरे सर पूर्वी आम आदमी पक्षात होते पण तेथे काही वाद झाल्यामुळे त्यांना पक्षात निलंबित करण्यात आले. अहिरे सर जेव्हा मागील निवडणुकीत उभे राहिले तेव्हा त्यांनी स्वताचा प्रचार स्वताच केला होता, त्यांना ना कार्यकर्ते ना भाडोत्री कार्यकर्ते त्यांनी एकट्याने स्वता जाऊन प्रचार केला होता.त्यामुळे देखील ते चर्चेत आले होते, सचिन अहिरे मागील अनेक वर्षांपासून नाशिकच्या स्थानिक प्रश्नांसाठी झटत आहेत.

एकदा त्यांनी दिल्लीमध्ये जाऊन नाशिककरांचे प्रश्न मांडत आंदोलन देखील केले होते. अहिरे सरांना लोकांनी नावे ठेवू, त्यांच्यावर विनोद करू, मीम्स बनविले पण त्यांनी त्यांचे काम सुरूच ठेवले, अखेर आता लोकांना त्यांची तळमळ समजत आहे. यावर्षी देखील अहिरे सर पुन्हा निवडणुकीला उभे राहणार आहेत. त्यांच्या प्रचाराला राज्यांतून अनेक युवक देखील येणार आहेत. सचिन अहिरे यांच्या सातत्यामुळे आता लोकांना देखील ते लोक प्रतिनिधी म्हणून हवे आहेत. आता या निवडणुकीत अहिरे सर काय कमाल करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.